सरकारी अधिकाऱ्यांना मोटारी भाड्याने न देता वापरल्या अवैध दारू वाहतुकीसाठी

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - मोटारी भाडेतत्त्वावर घेऊन एका टोळीने तब्बल ७५ मोटारींचा अपहार केल्याची बाब येरवडा पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. कराराप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना गाडी भाड्याने न देता त्या अवैधपणे दारूवाहतुकीसाठी देण्यात आल्या होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आशिष गंगाराम पुजारी (वय ३२, रा. पालघर), सत्यप्रकाश मिठालाल वर्मा (३०, रा. वसई) आणि अयान ऊर्फ राहुल ऊर्फ अन्थोनी पॉल छेतीयार (३८, रा. मुंबई) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार हैदलअली आलंदार हुसेन सय्यद (रा. लोहगाव), सादिकेत अकबर अहमद (रा. ठाणे) आणि मुन्नाचाचा (पूर्ण नाव नाही) हे तीन जण पसार आहेत. येरवडा पोलिस ठाण्यात श्रीधर मुरलीधर जगताप (वय ३०, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली. 

सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, हैदरअली सय्यद याने त्याच्या साथीदारांसह येरवड्यातील प्रतीकनगर येथे ‘द सिटी ट्रॅव्हल्स’ नावाने कंपनी सुरू केली. आरोपींनी जगताप यांची इनोव्हा व इतरांच्या स्विफ्ट डिझायर, इर्टिगा, इनोव्हा, एक्‍सेंट अशा वेगवेगळ्या ७५ मोटारी करार करून भाडेतत्त्वावर घेतल्या. मात्र, करारात ठरल्याप्रमाणे भाड्याची रक्कम दिली नाही. तसेच मोटारी सरकारी अधिकाऱ्यांना भाड्याने न देता अवैध दारू वाहतुकीसाठी वापरल्या. संबंधित गाड्या मूळ मालकांना परत न करता त्यांचा अपहार केला.

आरोपींना कोठडी
पोलिसांना आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील वाहने जप्त करावयाची आहेत. अशा प्रकारे गुन्हे करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत आहे, तर आरोपींविरोधात अशाच प्रकारचे गुन्हे नेरुळ पोलिस ठाण्यात दाखल आहेत, असे पोलिस रिमांडमध्ये नमूद केले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख यांनी आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com