Video : एका 'फेसबुक पोस्ट'ने त्यांना आणले मायदेशी

stu.jpg
stu.jpg

पुणे : मायदेशापासून कोसो दूर लंडनमध्ये होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे  तेथेही लॉकडाऊन घोषित झाला. हातातील नोकरी गेली, जवळचे पैसेही संपले आणि व्हिसाची मुदत देखील संपली. देशात परतायचे होते, परंतु वारंवार अर्ज करूनही उपयोग होत नाही, म्हटल्यावर न राहून फेसबुकवर पोस्ट टाकली. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या एका सोशल मीडियावरील पोस्टने मला मायदेशी परत आणले, अशा शब्दात यशा पालनकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लॉकडाउनमुळे काही दिवसांपासून लंडनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी अखेर मायदेशी परतले. गौरांग तांदुलवडकर (महाराष्ट्र), यश साली (महाराष्ट्र), रिषभ सरसुनिया (दिल्ली), आयुष भुतानी (राजस्थान), नवदीप जंगीर (राजस्थान), यशा पालनकर (महाराष्ट्र) हे त्यातील काही विद्यार्थी. यातील तीन जण पुण्यातील आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

परतीच्या प्रवासाबद्दल यशा म्हणाल्या,"लंडनमध्ये स्थलांतराचा अर्ज भरून देखील कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. दोन महिन्यांपूर्वी व्हिसाची मुदत संपत आली होती. मी परतीच्या प्रवासासाठी खूप प्रयत्न केले. दोन महिन्यांपासून भारतीय दुतावासाकडून 'आम्ही प्रयत्नात आहोत' इतकेच उत्तर मिळत होते. तीन -चार विमान येऊन गेली, परंतु यादीत माझे नाव येतच नव्हते. माझी नोकरी गेली , जवळचे पैसे संपले होते.

दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस गिरीश गुरुनानी यांची फेसबुकवरील पुण्यातील काही विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबतची पोस्ट वाचली आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला.  गुरनानींनी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्याशी त्वरित संपर्क साधला. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे माझे नाव स्थलांतरित प्रवाशांच्या यादीत आले,"
गुरनानी म्हणाले,"

लंडनमध्ये अडकलेल्या पाच विद्यार्थ्यांनी फेसबुकद्वारे संपर्क साधून मदतीसाठी विनंती केली. त्यानंतर मी त्वरित ट्वीटरद्वारे सुप्रिया सुळे आणि धीरज शर्मा यांना माहिती कळविली. त्यानंतर त्यांना मायदेशी आणण्यासाठी वेगाने पावले उचलण्यात आली."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com