सांगवीत कचराकुंड्या भोवती लावणार पत्राशेड

रमेश मोरे
गुरुवार, 21 जून 2018

जुनी सांगवी येथे आरोग्य विभागाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असुनही रस्त्यावर नागरीकांकडुन फेकला जाणारा कचरा उचलुन पुन्हा कचराकुंड्या टाकण्यासाठी मनुष्यबळ खर्ची करावे लागत आहे.

जुनी सांगवी - जुनी सांगवीत रस्त्यावर नागरीकांकडुन टाकण्यात येणाऱ्या कचरा समस्येला कंटाळुन आरोग्य व स्थापत्य विभागाकडुन येथील दोन कचरा कुंड्याभोवती पत्राशेड मारण्यात येणार आहे. जुनी सांगवी येथे आरोग्य विभागाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असुनही रस्त्यावर नागरीकांकडुन फेकला जाणारा कचरा उचलुन पुन्हा कचराकुंड्या टाकण्यासाठी मनुष्यबळ खर्ची करावे लागत आहे. यावर उपाय म्हणुन मुळानदी किनारा रस्त्यावरील आनंदनगर संत गोरोबा कुंभार उद्यानासमोरील कचराकुंड्या मागे हटविण्यात येवुन त्या भोवती पत्राशेड लावण्यात येणार आहे.

मोडकळीस आलेल्या कचरागाड्या, तुंबणारा कचरा व नागरीकांकडुन कचरा कुंडी ऐवेजी कचराकुंड्यांभोवती भिरकवला जाणारा कचरा यामुळे कचरा समस्या बिकट झाली आहे. रात्री येथे हॉटेल, चायनिज सेंटर यातून राहिलेले अन्नपदार्थ टाकले जातात. याचबरोबर फेरीवाले भाजी विक्रेते या कुंड्यात भाजीचा कचरा राहिलेली भाजी टाकुन जातात. भरीस भर म्हणुन नागरीक घरातील टाकाऊ वस्तु गाद्या, चिंध्या आदी वस्तु कुंड्यांभोवती भिरकावुन जातात. औंध पुण्याकडे सकाळी शाळा महाविद्यालयाकडे जाताना या रस्त्याचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सकाळी पुण्याकडे कामासाठी जाणारी मंडळीही या रस्त्याचा वापर करतात. रस्त्यावर आलेला कचरा अन्नपदार्थ यामुळे येथे भटक्या जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. तर या कचरा कुंड्यांच्या पुढे शंभर मिटर अंतरावरच शाळा आहे. रस्त्यावर आलेल्या कचरा व दुर्गंधीतुन विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते.पुरेसे मनुष्यबळ असुनही नागरीकांकडुन उघड्यावर फेकला जाणारा कचरा उचलण्यास मनुष्य बळाचा वेळ जात असल्याने ईतर ठिकाणच्या स्वच्छता कामावर याचा ताण येतो. असे असल्याने केवळ कचरा कुंड्याभोवती पडणारा कचरा रस्त्यावर येवु नये यासाठी कुंड्याभोवती पत्राशेड मारून कचरा कुंडीतच टाकावा असे निवेदन व सुचनाफलक लावण्यात येणार आहेत. येथील समस्या यामुळे कमी होण्यास मदत होईल. 

याआधी सांगवी औंध पुलावर पडणारा कचरा रोखण्यासाठी पुलावर सुशोभिकरण करण्यात आले. तेथील कचरा प्रश्न मिटला असुन कुंड्याभोवती पडणारा कचरा अस्ताव्यस्त होवुन रस्त्यावर येवु नये यासाठी कुंड्याभोवती तात्पुरते पत्राशेड लावण्यात येणार आहे. - उद्धव डवरी आरोग्य अधिकारी जुनीसांगवी

स्थापत्य विभागाकडुन कचराकुंड्याभोवती तात्पुरते पत्राशेड लावण्यात येणार आहे. - सचिन सानप - कनिष्ठ अभियंता स्थापत्य
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: trash around the common dustbin for public at sangvi