बस व एसटी थांब्याला कचरऱ्याचा वेढा

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 31 मे 2018

मांजरी : पुणे-सोलापूर महामार्गावरील आकाशवाणी केंद्रा समोरील थांब्याशेजारी परिसरातील कचरा जमा केला जात आहे. त्यामुळे येथील बस व एसटी थांब्याला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. बसच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना त्यामुळे येथे दुर्गंधी व माशांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मांजरी : पुणे-सोलापूर महामार्गावरील आकाशवाणी केंद्रा समोरील थांब्याशेजारी परिसरातील कचरा जमा केला जात आहे. त्यामुळे येथील बस व एसटी थांब्याला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. बसच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना त्यामुळे येथे दुर्गंधी व माशांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

याठिकाणी शहरात जाणाऱ्या बस प्रवाशांसाठी  बसथांबा तर व सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या एसटी उतारूंसाठी विनंती थांबा आहे. त्यामुळे येथील थांब्यावर सतत प्रवाशांची गर्दी असते. त्यामध्ये परिसरातील विद्यार्थी व कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, येथे दररोज कचरा वेचकांकडून जमा होणारा कचरा थेट थांब्यावरच एकत्रीत जमा केला जात आहे. त्यामुळे थांब्याला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. कचऱ्याच्या हातगाड्या, बकेट दिवसभर थांब्याच्या शेजारी व मागील बाजूस लावून ठेवलेल्या असतात. अनेक नागरिकही याठिकाणी कचरा टाकून जातात. त्यामुळे प्रवाशांना त्याची दुर्गंधी, त्यावर घोंगावणाऱ्या माशा व कुत्र्यांच्या झुंडीशी सामना करावा लागत आहे. 

दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अनेक वेळा त्याबाबत पालिकेत तक्रारी केल्या आहेत. मात्र, पालिकेडून गांभीर्याने घेतले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. येथे गोळा केल्या जात असलेल्या कचऱ्याचे ठिकाण बदलावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

"मी व माझ्या बरोबर अनेकजण नोकरीच्या निमित्ताने शहरात जाण्यासाठी दररोज या थांब्यावर बसची प्रतिक्षा करीत असतो. मात्र, येथे जमा होत असलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे सकाळीच उत्साह मावळतो. अनेकदा कुत्र्यांच्या झुंडीमुळे जीव मुठीत घेऊन उभे राहवे लागते. त्यासाठी कचरा गोळा करण्याची ही जागा बदलावी.''
- गणेश जगताप, नोकरदार प्रवासी

 

Web Title: Trash siege around bus and ST stop