अवयवदान जनजागृतीसाठी भारत भ्रमण

Pramod-mahajan
Pramod-mahajan

पुणे - सैन्य दलातील असलेल्या प्रमोद महाजन यांनी अठरा वर्षांपूर्वी स्वतःची किडनी (मूत्रपिंड) दान करून एका जवानाला जीवनदान दिले होते. अवयवदानासारख्या ज्वलंत विषयावर पुन्हा एकदा जनजागृती करण्यासाठी महाजन आता भारत भ्रमण यात्रेला निघाले आहेत. दुचाकी वाहनावरून शंभर दिवसांत ते दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून अवयवदानाबाबत देशवासीयांमध्ये जागृती करणार आहेत. 

शनिवारवाड्यापासून त्यांच्या या अनोख्या प्रवासाला रविवारी (ता. २१) सकाळी आठ वाजता सुरवात होणार आहे. रिबर्थ फाउंडेशनकडून महाजन यांची ही दुचाकी मोहीम आयोजित केली आहे. अवयवदानाबाबत प्रचार व प्रसार होण्यासाठी महाजन हे भारत भ्रमंती करणार आहेत. मोहिमेदरम्यान ते अठरा राज्यांना भेटी देऊन अवयवदानाचे महत्त्व लोकांना पटवून देणार आहेत. निवृत्त सैन्याधिकारी असलेल्या ६७ वर्षीय महाजन यांनी १८ वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील एका जवानाला आपली किडनी दान केली होती. त्या वेळी अवयवदानाबाबत समाजात फारशी जनजागृती झाली नव्हती, त्या वेळी महाजन यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आणि एक जवानाचे प्राण वाचविले. महाजन म्हणाले, ‘‘अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी मी मोहिमेवर निघालो आहे. या मोहिमेचे नाव भारत ऑर्गन यात्रा असे ठेवले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com