बारामतीतील संत निरंकारी ट्रस्टकडून प्रवाशांना मदत

मिलिंद संगई
रविवार, 11 ऑगस्ट 2019

गेल्या तीन चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज नजीक अनेक ट्रक व इतर वाहने अडकली होती. त्यांच्या मदतीसाठी बारामतीसह फलटण, खंडाळा, शिरवळ येथून पाचशेहून अधिक निरंकारी स्वयंसेवक मदतीला धावून गेले. संत निरंकारी ट्रस्टच्या माध्यमातून या अडकलेल्या प्रवाशांसाठी शुक्रवारी सकाळी १० ते २ या वेळेत सर्वांसाठी उंब्रज सत्संग भवन या ठिकाणी चहा, नाष्टा यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

बारामती शहर : गेल्या तीन चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज नजीक अनेक ट्रक व इतर वाहने अडकली होती. त्यांच्या मदतीसाठी बारामतीसह फलटण, खंडाळा, शिरवळ येथून पाचशेहून अधिक निरंकारी स्वयंसेवक मदतीला धावून गेले. संत निरंकारी ट्रस्टच्या माध्यमातून या अडकलेल्या प्रवाशांसाठी शुक्रवारी सकाळी १० ते २ या वेळेत सर्वांसाठी उंब्रज सत्संग भवन या ठिकाणी चहा, नाष्टा यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

सदर भोजनाची व्यवस्था सातारा झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या सुचनेनुसार संत निरंकारी मंडळ उंब्रज, खंडाळा, शिरवळ शाखेच्या वतीने करण्यात आली. तसेच रोगराई पसरु नये म्हणून आवश्यक असेल त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

संत निरंकारी मंडळ सातारा झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा क्षेत्राचे संचालक दिपक शेलार, बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने, उंब्रज शाखेचे प्रमुख अर्जुन राठोड, खंडाळा शाखेचे माऊली भोसले, शिरवळ शाखेचे सतीश गावडे, सेवादल अधिकारी तसेच दीडशे ते दोनशे निरंकारी स्वयंसेवक यांनी मोलाचे योगदान दिले. या प्रसंगी स्थानिक पाेलिस अधिकारी, जवान यांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्याचे झांबरे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travelars help from Sant Nirankari Trust in baramati