Pune Rains : ट्रेझर पार्क सोसायटीतील सहाशे गाड्या पाण्यातच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पद्मावती परिसरातील ट्रेझर पार्क सोसायटीच्या पार्किंगमधील सुमारे सहाशे गाड्या अजूनही पाण्यात आहेत. बुधवारी (ता. २५) रात्री धुवाधार पावसामुळे शेजारील ओढ्याला असलेली संरक्षक भिंत कोसळल्यामुळे पार्किंगमध्ये हे पाणी शिरले.

पुणे - पद्मावती परिसरातील ट्रेझर पार्क सोसायटीच्या पार्किंगमधील सुमारे सहाशे गाड्या अजूनही पाण्यात आहेत. बुधवारी (ता. २५) रात्री धुवाधार पावसामुळे शेजारील ओढ्याला असलेली संरक्षक भिंत कोसळल्यामुळे पार्किंगमध्ये हे पाणी शिरले. ते उपसण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे. संपूर्ण पाण्याचा उपसा करण्यासाठी अजूनही दोन ते तीन दिवस लागण्याची शक्‍यता आहे. 

सोसायटीच्या पार्किंगमधील विजेचे मीटर पाण्यात गेले, त्यामुळे सोसायटीत अंधार दाटला आहे आणि निदान पुढील चार- पाच दिवस अशीच परिस्थिती असेल. तसेच, येथील बागही उद्‌ध्वस्त झाली आहे. पार्किंगमधील गाड्यांमध्ये साधारण चारशेच्या आसपास चारचाकी आणि दोनशे दुचाकी असण्याची शक्‍यता आहे. संपूर्ण पाणी हटविल्यानंतरच सगळी परिस्थिती स्पष्ट होऊ शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treasure Park Society six hundred car in the water