अवशेषांत दडला माहितीचा खजिना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मार्च 2019

शोधनिबंध ‘नेचर’मध्ये प्रकाशित
हरियानातील भिराना परिसरातील उत्खननात मिळालेली हाडे व दातांच्या अभ्यास करून लिहिलेला शोधनिबंध ‘नेचर’ या जागतिक पातळीवर नियतकालिकात प्रकाशित झाला. राखीगढीतील अवशेषांवर माझे काम सुरू आहे. असे डॉ. आरती देशपांडे - मुखर्जी यांनी सांगितले.

पुणे - उत्खननांमधून सापडणारी प्राण्यांची हाडे, दात तसेच शंखशिंपल्यांचा अभ्यास करून त्या काळच हवामान, तापमान, भूजलाची उपलब्धता आदींसंदर्भात अंदाज मांडता येतो. या संदर्भात पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील सहायक प्राध्यापिका, पुराजैवशास्त्रज्ञ डॉ. आरती देशपांडे - मुखर्जी यांचे संशोधन मोलाचे ठरले आहे. ते पुराजैवशास्त्र अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठरले असून, या अवशेषांत माहितीचा खजिना दडला आहे.

आज प्रदीर्घ वाळवंटी प्रदेश शतकांपूर्वी ‘कसा सुजलाम्‌ सुफलाम्‌’ होता, हे त्या तेव्हाच्या पर्यावरणाबाबतचे पुरावे देऊन त्या स्पष्ट करतात. नंतर परिवर्तन कशामुळे झाले, तिथले जनजीवन कसे होते, कोणते प्राणी होते व तेव्हाचे त्यांचे स्वरूप कसे होते, वनस्पती कुठल्या होत्या वगैरे इतिहास त्या जिवंत करतात.

आरती यांच्या गाजलेल्या संशोधनांपैकी एक म्हणजे कच्छच्या रणातील धोलाविरातील उत्खनन आहे. तेथे शंखशिंपल्यांच्या अवशेषांचे मोठे भांडार. प्रचंड प्रमाणात शिंपल्यांच्या बांगड्या, मणी व अंगठ्या सापडल्या होत्या. त्याचा अभ्यास करून त्यांनी पुराव्यांसह सांगितले, की येथे शिंपल्यांच्या दागिन्यांचे मोठे निर्मिती केंद्र आणि बाजारपेठ होती. हे सारे येथून निर्यातही केली जाई. ही कारागिरी, हा भव्य उद्योग महिलांच्या जिवावरच उभा राहिला  असेल असे मी अभ्यासाआधारे मांडले. बंगालमध्ये सुवासिनी स्त्रियांमध्ये शंखाच्या बांगड्या वापरण्याची परंपरा आहे. या संदर्भात बिष्णुपुर परिसरातील शंखारी या समुदायाकडून या बांगड्यानिर्मितीची पद्धत व इतिहास मी जाणून घेतला. त्यातून अनेक धागेदोरे मिळाले.’’ 

शोधनिबंध ‘नेचर’मध्ये प्रकाशित
हरियानातील भिराना परिसरातील उत्खननात मिळालेली हाडे व दातांच्या अभ्यास करून लिहिलेला शोधनिबंध ‘नेचर’ या जागतिक पातळीवर नियतकालिकात प्रकाशित झाला. राखीगढीतील अवशेषांवर माझे काम सुरू आहे. असे डॉ. आरती देशपांडे - मुखर्जी यांनी सांगितले.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treasures of information hidden in the ruins says