कोरोनाबाधित रुग्णांबाबत जिल्हाधिकारी म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोनाबाधित आणि इतर आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी सर्व डॉक्टरांनी खबरदारी घ्यावी. तसेच, वैद्यकीय सेवेविषयी नागरिकांमध्ये अधिक विश्वास निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
 

पुणे : कोरोना बाधित आणि इतर आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी सर्व डॉक्टरांनी खबरदारी घ्यावी. तसेच, वैद्यकीय सेवेविषयी नागरिकांमध्ये अधिक विश्वास निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत खासगी, सरकारी रुग्णालय आणि प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. 

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  खासगी आणि सरकारी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करुन त्यांना मानसिक आधार द्यावा. वैद्यकीय सेवेविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. तसेच, ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविडची तपासणी करण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी कोविडच्या रुग्णांना भरती करण्यासाठी आदेश द्यावेत. प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड-19 नमुने तपासणीसाठी येत आहेत. त्या नमुना तपासणीचे अहवाल वेळेत प्राप्त करुन द्यावेत. सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्री कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असे राम यांनी  स्पष्ट केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले, सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कामे करावीत. काही अडीअडचणींबाबत तात्काळ जिल्हा प्रशासनास माहिती सादर करावी. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, रुग्णालय आणि प्रयोगशाळांचे वैद्यकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treat corona infected patients on time and quickly says Collector