रुग्णांच्या अन्य आजारांवरही उपचार करा;महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रशासनाला बैठकीत सूचना 

रुग्णांच्या अन्य आजारांवरही उपचार करा;महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रशासनाला बैठकीत सूचना 

पुणे - कोरोनाची लागण असली तरी, या आजाराच्या रुग्णांचा मृत्यू हा हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अस्थमामुळेच होत असल्याची बाब महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सभागृह नेते आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली आहे. कोरोनाच्या रुग्णांना अन्य जे काही आजार आढळून येत आहेत, त्यावर उपचार करा आणि रुग्णांना बरे करा; अशा सल्लावजा सूचना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाने 264 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोना हे कारण असले तरी, या मृतांमागे अन्य आजाराची कारणे आहेत. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत 5.31 टक्के रुग्णांचा जीव जात असल्याचे पुढे आले आहे. सरासरी हे प्रमाण अडीच ते तीन टक्के अपेक्षित असतानाही पुण्यात ते जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्याचवेळी महापालिकेच्या विलगीकरण कक्षातील लोकांची गैरसोय होत आहेत, अशा तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते. यात मृत्यूदर कमी करण्याबाबत प्राधान्याने चर्चा झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com