पुणे: पानशेत रस्त्यावर झाड पडल्याने दोन तास वाहतूक कोंडी

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 2 जून 2018

पानशेत रस्त्यावर खानापूरच्या पुढे रस्तालगत झाडे आहेत. मालखेड, वरदाडे, निगडे, ओसाडे, या ठिकाणी झाडे पडली होती. आंब्याचे, सुभाबुळ झाडे रस्त्यावर पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजू बंद झाल्याने पुणे पानशेत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिक कुऱ्हाडी, कोयत्याने झाडाच्या फांद्या तोडल्या. त्यामुळे, तात्पुरती वाहतूक सुरू करण्यात झाली. 

खडकवासला : पुणे- पानशेत रस्त्यावर झाड पडल्याने डोकं तास वाहतूक ठप्प होऊन कोंडी झाली होती.  वीजेचे खांब पडल्याने तारा रस्त्यावर पडल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी झाडाच्या फांद्या तोडल्याने शुक्रवारी संध्याकाळी वाहतूक सुरळीत झाली. 

पानशेत रस्त्यावर खानापूरच्या पुढे रस्तालगत झाडे आहेत. मालखेड, वरदाडे, निगडे, ओसाडे, या ठिकाणी झाडे पडली होती. आंब्याचे, सुभाबुळ झाडे रस्त्यावर पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजू बंद झाल्याने पुणे पानशेत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिक कुऱ्हाडी, कोयत्याने झाडाच्या फांद्या तोडल्या. त्यामुळे, तात्पुरती वाहतूक सुरू करण्यात झाली. 

अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. वारा ही होता.  स्थानिक नागरिकांनी ओसाडे गावातून निगडेगावातून आम्हाला पर्यायी रस्त्याने पुण्याला जाण्यासाठी रस्ता सांगितला. परंतू वरदाडे फाटा येथे दुसरे झाड पडले होते. स्थानिक नागरिकांनी पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्याने रस्ता सुरू झाला. अशी माहिती सकाळच्या वाचक मानसी करंदीकर यांनी सांगितले. 

वरदाडे येथील सुमारे 30- 40 फूट उंचीची सुभाबुळ रस्त्यावर पडली. त्यामुळे, रस्त्या पूर्ण बंद झाला होता. गावातील मंडळाच्या मुलानी झाडांच्या फांद्या तोडल्या. जेसीबीच्या सहाय्याने झाडाचा बुंधा बाजूला काढला. त्यासाठी संध्याकाळचे सहा वाजले होते. असे वरदाडेचे माजी उपसरपंच विठ्ठल ठाकर यांनी सांगितले. 

दरम्यान, रस्त्यावर झाडे पडल्याची माहिती मिळताच आमचे कामगार घटनास्थळी पोचले. त्यावेळी, तात्पुरती वाहतूक सुरू झाली होती. उद्या सकाळी जेसीबी नेऊन पडलेली झाडे बाजूला काढण्यात येतील. वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू होईल. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नकुल रणसिंग यांनी सांगितले. 

Web Title: tree collapsed on Panshet road pune