येरवड्यात वृक्षांवर कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

येरवडा - वाडिया बंगला येथील खराडी ते शिवणे या शंभर मीटर रस्त्याच्या दरम्यान येणारे पावणेदोनशे वृक्ष काढणार आहेत. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे. नगर रस्ता चार पदरी असताना पुन्हा नव्याने रस्त्याची काय गरज आहे, असा प्रश्‍न पर्यावरण संघटनांनी केला आहे.

येरवड्यातील मुळा -मुठा नदी पात्राशेजारी वाडिया स्टड फार्मची जागा आहे. यातील काही जागा खराडी ते शिवणे रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेला हस्तांतर करण्यात आली आहे. मात्र, या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष आणि जैवविविधता आहे. उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने याबाबत अहवाल तयार केला आहे.

तो पाहिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी वृक्ष काढणे व पुनर्रोपण करण्यासाठी मान्यता दिली आहे. यामध्ये १६७ वृक्षांचा समावेश आहे. त्यामध्ये सुबाभूळ, बाभूळ, बोर, चंदन, करंज असे एकूण वीस प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे. यापैकी ४४ झाडे पूर्णपणे काढली जाणार आहेत, तर १२३ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. वृक्षांवर तशा प्रकारची नोटीस लावण्यात आली आहे. मात्र, याला पर्यावरण संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. रस्ता रुंदीकरणात केवळ वृक्षांची कत्तल होणार नसून, येथील जैवविविधता नष्ट होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नदीकिनारी रस्ता तयार करताना पुराचा विचार केला गेला नाही. काही ठिकाणी ग्रीनझोन बदल करण्यात आले आहेत. येथील वृक्षांवर अवलंबून असलेल्या पक्षी, किडे, फुलपाखरांचा विचार कोण करणार? 
- पौर्णिमा जोशी, फ्रेंड्‌स ऑफ डॉ. सालिम अली बायोडायव्हर्सिटी पार्क

Web Title: Tree Cutting In Yerwada