वृक्षारोपण फक्त फोटो पुरतेच न होता त्यांचे संगोपन होणे गरजेचे - सुप्रिया सुळे

संतोष आटोळे
शनिवार, 7 जुलै 2018

शिर्सुफळ (पुणे) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात येत असलेले वृक्षारोपण फक्त फोटो पुरतेच मर्यादित न राहता त्यांचे संगोपन होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

शिर्सुफळ (पुणे) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात येत असलेले वृक्षारोपण फक्त फोटो पुरतेच मर्यादित न राहता त्यांचे संगोपन होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांर्तगत सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातुन बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी ते शिर्सुफळ यामार्गाच्या दुर्तफा सुमारे दोन हजार पाचशे झाडे लावण्यात येणार आहेत.याचा शुभारंभ खा.सुळे यांच्या हस्ते झाला.यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, वनक्षेत्रपाल अजित शिंदे, वनपाल एम.पी.मुळे,  वनरक्षक डी.जे.अवघडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातुन सासवड ते भिगवण या प्राथमिक जिल्हा मार्ग 61 मधिल निंबोडी ते शिर्सुफळ या मार्गावर दोन्ही बाजुला झाडे लावण्यात येणार आहेत.

बारामती तालुक्यात 56 हजार वृक्ष लावणार..
याबाबत अधिक माहिती देताना वनक्षेत्रपाल अजित शिंदे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातुन बारामती तालुक्यामध्ये या पावसाळ्यात 56 हजार वृक्ष लावण्यात येणार आहे.तसेच त्यांच्या संगोपनासाठीही उपाययोजना केल्या जातील.

Web Title: tree plantation is not enough for photography said supriya sule