पुणे - पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण

मिलिंद संधान
शनिवार, 23 जून 2018

नवी सांगवी (पुणे) : आपला परिसर सुदंर व हिरवा दिसावा हा उद्देश मनात ठेऊन पिंपळे सौदागर येथील प्राईम प्लस सोसायटीच्या वतीने परिसारत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शितल काटे, चेअरमन पंकज भाकरे, संजय सावंत, आशिष पाटील, गोरडी दत्ता, अंजली भाकरे यांच्यासह जेष्ठनागरिक व बालगोपाळ उपस्थित होते.

यावेळी कडुलिंब, निलगिरी या देशी झाडांबरोबर हिरवा व पांढऱ्या रंगाचे विदेशी फायकस ही वृक्षही लावण्यात आली. सोसायटीच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून सोनचाफा, मोगरा या फुलझाडांचीही लागवड करण्यात आली. तर सभासदांनी टेरेस सजविण्याकरिता त्यांना गुलाब, तुळस रोपे वाटण्यात आली. 

नगरसेवक नाना काटे म्हणाले, "वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्व पटू लागले आहे, परिपूर्ण वाढलेली दोन झाडे  चारजणांच्या कुटुबांसाठी पुरेसा ठरेल एवढा आॅक्सिजन निर्माण करतात."

ही वृक्ष लाऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या वेळी उपस्थित नागरिकांच्या वतीने करण्यात आला.

Web Title: tree plantation in pimpale saudagar