फळबाग लागवड योजनेची शनिवारी सोडत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कळस : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतंर्गत मागविण्यात आलेल्या अर्जांचे लाभार्थी निवडीसाठी लॉटरी पध्दतीने सोडत शनिवारी (ता. 25) होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव यांनी दिली. 

जाधव म्हणाले, 7 ऑगस्ट अखेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतंर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये आंबा (66 अर्ज), पेरु (147 अर्ज), डाळींब (106 अर्ज), संत्रा (4 अर्ज), मोसंबी (21 अर्ज), कागदी लिंबू (12 अर्ज), नारळ टी.डी. (3 अर्ज), सिताफळ (76 अर्ज), आवळा (1 अर्ज), चिंच (21 अर्ज), जांभूळ (3 अर्ज), अंजीर (1 अर्ज), चिक्कू (10 अर्ज) या पिकांसाठी 471 अर्ज प्राप्त झाले आहेत. 

यामध्ये समाविष्ठ अर्जांनुसार सुमारे 439.77 हेक्टरवर लागवड होईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्राप्त अर्जांची घटकनिहाय प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली आहे. जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाचे प्रतिनीधी, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या अर्जांची तालुका बीजगुणन केंद्रावर लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. तरी या सोडतीसाठी अर्जदार शेतकऱ्यांनी 
उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी अधिकारी जाधव यांनी केले आहे.

Web Title: tree plantation schema for farmers