झाडे लावून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

आदम पठाण
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

वडापुरी : इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे 1 ऑगस्ट ला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती झाडे लावून साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले व इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांच्या हस्ते गावात जयंतीचे औचित्य साधून वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी अभिजीत तांबीले म्हणाले, की लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आदर्श समाजातील प्रत्येक तरुण युवकांनी घेतला पाहिजे. तरुण युवकांनी संघटीत होवून सगळ्याच क्षेत्रात व व्यवसायात पुढे आले पाहिजे. जिल्हा परिषदच्या मिळणाऱ्या विविध विकास कामाचा व योजनांचा सुध्दा लाभ गावातील सर्वांनी घ्यावे असे आवाहन तांबिले यांनी यावेळी केले.

सरपंच रमेश देवकर, उपसरपंच सुयोग देवकर, शशिकांत आरडे, कैलास देवकर, गणेश शिंगाडे, विजय देवकर, शरद देवकर, बाळासाहेब पाटील, नितीन आरडे, राहुल सोनवणे, बाळासाहेब लोखंडे, हनुमंत सोनवणे, आबा आरडे, प्रकाश आरडे उपस्थित होते.

Web Title: Tree plantation for Shahir Anna Bhau Sathe jayanti