जय जवान, जय किसान, जय विज्ञान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पुणे - अन्न सुरक्षा हीच राष्ट्र सुरक्षेची चावी असून, कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्याचे कायमस्वरूपी धोरण स्वीकारण्याची गरज आहे. सैनिक, वैज्ञानिक आणि शेतकरी या तीनही घटकांना समान महत्त्व आहे. राष्ट्राभिमान असलेल्या या त्रिसूत्रीला देशवासीयांनी कायम स्मरणात ठेवावे, असे सांगत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी ‘जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान’चा नारा दिला.  

येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये ‘शाश्वत व फायदेशीर शेती’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचा शुक्रवारी समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय सचिव आय. व्ही. सुब्बा राव, टी. चटर्जी, प्रा. अशोक गुलाटी या वेळी उपस्थित होते. 

नायडू म्हणाले, अनियमित मॉन्सून, स्थानिक बाजारभावांतील चढ-उतार, जागतिक बाजारपेठ आणि नैसर्गिक आपत्ती या बाबींचा कृषी क्षेत्रावर थेट परिणाम होतो. त्यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. चर्चासत्रात अभ्यासगटांकडून आलेल्या सूचनांबाबत केंद्र सरकार ठोस निर्णय घेईल.

रूपाला म्हणाले, केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळवून देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. येत्या खरीप हंगामापासून उत्पादित होणाऱ्या शेतमालाला किमान हमीभाव (एमएसपी) दीडपट देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

आंध्र प्रदेशचे माजी मंत्री व्ही. एस. राव, केंद्रीय कृषी सचिव एस. के. पटनायक, प्रा. गुलाटी, एस. के. मल्होत्रा, अशोक दलवाई, निती आयोगाचे सल्लागार जे. पी. मिश्रा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्वनाथ आणि कृषी विभागाचे सहआयुक्त दिनेश कुमार यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले.

Web Title: tree plantation venkaiah naidu