पुणे : पेठांमधील वृक्षराजी घटली

एकेकाळी हिरवाईची चादर पांघरलेल्या रस्त्यांमुळे पुण्यातील वनसंपदा समृद्ध होती.
Pune City
Pune CitySakal
Summary

एकेकाळी हिरवाईची चादर पांघरलेल्या रस्त्यांमुळे पुण्यातील वनसंपदा समृद्ध होती.

पुणे - एकेकाळी हिरवाईची चादर पांघरलेल्या रस्त्यांमुळे पुण्यातील (Pune) वनसंपदा समृद्ध होती. वाढत्या शहरीकरणामुळे (Urbanization) हळूहळू काँक्रिटच्या जंगलांत वाढ होत असून, विकासकामे करताना अनेक वृक्षांची तोड (Tree Cutting) व स्थलांतरण करण्यात येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याकरिता महापालिका प्रशासन विविध योजनांतर्गत वृक्षारोपण आणि झाडांची लागवड अशा मोहिमा राबवित आहे. यामुळे गेल्या नऊ वर्षांत शहरातील झाडांची संख्या वाढत आहे. मात्र, असे असले तरी उपनगर आणि पेठांमधील भागांत मात्र झाडांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची बाब महापालिकेच्या वृक्षगणनेच्या तपशिलातून समोर आली आहे.

जागतिक पातळीवर झपाट्याने घट होत असलेल्या हरित क्षेत्रामुळे हवामान बदल, तापमानवाढ यासारख्या समस्या उद्‍भवत आहेत. त्यातच पुण्याचाही चेहरामोहरा बदलत असून, शहरीकरण, विकासकामे अशा विविध कारणांमुळे झाडे हटविणे अथवा त्यांचे पुनर्वसन करणे, कधीकधी जुनी झाडे उन्मळून पडणे या कारणांमुळे वसुंधरेची हानी होत आहे. तसेच पुनर्रोपण केलेली झाडे जगतीलच याचीदेखील शाश्‍वती नसून, बऱ्याचदा नव्याने लावण्यात आलेल्या रोपांचीदेखील काळजी घेतली जात नसल्याने ही झाडे जास्त काळ तग धरू शकत नाहीत.

पुणे महापालिकेच्या वतीने १५ क्षेत्रीय कार्यालयांमधील वृक्षांची गणना केली असून, त्यातील आकडेवारीनुसार शहरात झाडांची संख्या ५१ लाखांहून अधिक आहे. कसबा-विश्रामबाग वाडा आणि भवानी पेठ परिसरात केवळ ६७ हजार ९७२ इतकी झाडे आहेत. गेल्या नऊ वर्षांमध्ये भवानी पेठेत सुमारे ५० टक्के झाडांची घट झाली आहे. मध्यवर्ती पेठांमध्ये नव्याने होत असलेल्या बांधकामांमुळे झाडांची संख्या घटू लागली आहे.

नऊ वर्षांतील स्थिती

  • गेल्या नऊ वर्षांत शहरात १२ लाख ४३ हजार ५४७ झाडांची वाढ

  • काही ठिकाणी ५० ते ६० टक्क्यांहून अधिक घट

  • पेठांमध्ये एकूण संख्येच्या एक टक्क्यापेक्षाही कमी झाडे

  • सर्वाधिक झाडांची नोंद धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात

पुण्याच्या वनराईस हातभार लावा

  • पुण्याची गर्द वनराई आणखी बहरण्यासाठी तुम्ही झाडं लावण्यास इच्छुक आहात का?

  • तुम्ही पावसाळ्याआधी एक तरी झाड लावणार का?

  • जर तुमची वृक्षारोपणाची तयारी असेल तर मोबाईल क्रमांकासह आपली सविस्तर माहिती आम्हाला editor.pune@gmail.com या मेलवर जरूर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com