जुन्नरच्या आदिवासी भागात भात पिकाबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न

दत्ता म्हसकर
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

जुन्नर - अपुऱ्या पावसाअभावी तालुक्यातील हातातोंडाशी आलेले भातपिक धोक्यात आले असून भाताचा पेंढा देखील करपून गेल्याने जनावरांना काय द्यायचे असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांपुढे पडला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पाडळी गणाचे अध्यक्ष देवराम नांगरे यांनी सांगितले.

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने तोंडाशी आलेले भात पिक पाण्याअभावी वाया गेले आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भात शेतीचे 50 टक्के नुकसान झाले आहे. यातच शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजाही आहे असे असूनही सरकारी अधिकारी मात्र या प्रश्नांची कोणतीच दखल घेत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

आदिवासी भागातील भात पिकाची साधी पाहणी करण्यासाठी गावांमध्ये महसूल किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधी भेटही दिली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत अशात राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत जुन्नरचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत असून जुन्नर तालुक्याचा तातडीने समावेश करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

यावर्षी खरीप हंगामात तालुक्यात सुमारे 12 हजार 800 हेक्टर क्षेत्रात भातपिक घेण्यात आले. भाताचे पारंपारीक तसेच सुधारित सरकारी बियाण्याच्या भाताची लागवड करण्यात आली. सुरवातीला पावसाने चांगली साथ दिली मात्र सप्टेंबरच्या सुरवातीपासून दडी मारली.गणेशोत्सव व भाद्रपद पोळा यात हमखास होणार पाऊसही पडला नाही परिणामी हलक्या रानातील भात पीक जळून गेले आहे. पेंढा करपून गेला असल्याने जनावरे देखील तो खाणार नाहीत यामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा होती त्यांनी पाणी देऊन भात पीक तारले मात्र अशी उदाहरणे थोडी आहेत.डोंगर उतारावरील, उशिरा लागवड झालेली तसेच हलक्या जमिनीत असणारे भातपिक पाण्याअभावी वाया गेले आहे.

तालुक्याच्या 65 आदिवासी गावात भात हेच मुख्य पीक असून या पिकाच्या उत्पादनावर आदिवासी कुटुंबाचा वर्षभराचा गाडा चालतो.यावर्षी मात्र त्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. सरकारने या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत तसेच महसूल प्रशासन याची तत्काळ दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: In the tribal areas of Junnar, the question of animal husbandry with rice crop