आदिवासी विद्यार्थिनीं म्हणतात, आम्हाला फौजी व्हायचंय

पिंपरी : रनथॉन २०१९ मध्ये सहभागी झालेले मेळघाटातील आदिवासी विद्यार्थी.
पिंपरी : रनथॉन २०१९ मध्ये सहभागी झालेले मेळघाटातील आदिवासी विद्यार्थी.

पिंपरी - आम्ही बारावीपर्यंत शिकलोय. आणखी शिकायचं आहे. गावातील मुलांना शिकवायचं आहे. पोलिस नाही तर फौजी व्हायचंय, ही भावना आहे मेळघाटातील आदिवासी मुलींची. रोटरी क्‍लबतर्फे आयोजित रनथॉन स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक मिळविलेल्या मुला-मुलींशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. 

निगडित रनथॉन स्पर्धा झाली. त्यात सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील सोळा विद्यार्थी आठ दिवसांपासून शहरात दाखल झाले होते. टाटा मोटर्स कंपनीच्या वसतिगृहात त्यांची निवास व भोजन व्यवस्था केलेली होती. सोमवारी रात्री त्यांना निरोप देण्यात आला. त्या वेळी ‘सकाळ’ प्रतिनिधीने मुलांशी संवाद साधला. रनथॉनमध्ये मुलींच्या दहा किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवलेली कुसुमा मावसकर म्हणाली, ‘‘बारावीपर्यंत माझे शिक्षण झाले आहे. पुढेही शिकायचे आहे. आमच्या आदिवासी पाड्यांवरील मुलांना पाठ्यपुस्तकांबरोबरच मैदानी खेळही शिकवायचे आहेत. लष्करात भरती होऊन फौजी व्हायचं आहे.’’ असाच मनोदय रुकमा चतुर, अश्‍विनी मावसकर यांनीही व्यक्त केला.

पारितोषिकांचे मानकरी
मुलींच्या २१ किलोमीटर स्पर्धेत रुकमा चतुर (सातवा), १० किलोमीटर स्पर्धेत अश्‍विनी मावसकर (चौथी), पाच किलोमीटर स्पर्धेत विमल कासदेकर (द्वितीय), बबिता भूसुम (तृतीय) यांनी आणि मुलांच्या १० किलोमीटर स्पर्धेत लक्ष्मण मावसकर (दहावा), पाच किलोमीटर स्पर्धेत अजय सेलूकर (पाचवा), शिवा धिकार (नववा) आणि दोन किलोमीटर स्पर्धेत रामदास बेठेकर (प्रथम) व राम बेठेकर (द्वितीय) यांनी पारितोषिक पटकविले. कंपनीचे उपमहाव्यवस्थापक (एचआर) शरद सावंत, वरिष्ठ व्यवस्थापक तुषार कोंडे, कामगार क्रीडा समितीचे चेअरमन शशिकांत कात्रे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com