‘आदिवासींना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे - ‘‘आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नियुक्‍ती आणि स्थानिक ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम असायला हवा,’’ असे मत राष्ट्रीय शैक्षणिक योजना आणि प्रशासन संस्थेच्या शैक्षणिक प्रशासन विभागाचे प्रमुख प्रा. कुमार सुरेश यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ) यशवंतराव चव्हाण समाजशास्त्र आणि संशोधन संस्था आणि दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाचा समाजकार्य विभाग यांच्या वतीने ‘देशातील आदिवासी आश्रमशाळांची सद्यःस्थिती : समस्या, आव्हाने, पुढील दिशा’ विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. या वेळी राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे उपस्थित होते. ‘‘राज्यातीलच नव्हे, तर देशातील आदिवासी भागात शाळांची संख्या वाढली, हे खरे आहे; परंतु उपलब्ध शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते का? त्यांचा दर्जा काय?, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असले तरीही माध्यमिक शिक्षणात विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने रोडावत आहे,’’ असेही प्रा. सुरेश यांनी अधोरेखित केले. डॉ. साळुंखे यांनीही या वेळी विचार मांडले.

आदिवासी मुलांचा शैक्षणिक विकास साध्य करताना पायाभूत शैक्षणिक सुविधा, मुलांना त्यांच्या बोली भाषेत शिक्षण हे आवश्‍यक आहे. आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. 
 - डॉ. किरण कुलकर्णी, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

Web Title: Tribals need quality education Kumar Suresh