खंडणीची मागणी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे - बांधकाम व्यावसायिकाला खंडणीची मागणी करण्याबरोबरच सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. आरोपीच्या नावावर २० हून अधिक  गुन्हे दाखल आहेत.

उद्धलसिंग राजूसिंग ऊर्फ रामुसिंग ऊर्फ जम्बोसिंग दुधाणी (२८, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दुधाणीवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, वाहनचोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

रामटेकडीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) प्रकल्प उभारणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकास जानेवारी महिन्यात दुधाणीने १० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. त्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या निवृत्त पोलिस अधिकारी रामचंद्र घुगे यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे घुगे यांच्यावर सप्टेबर २०१७ मध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

Web Title: Tribute Demand Criminal Arrested Crime