काकासाहेब शिंदे यांना निंबूत येथे श्रध्दांजली

संतोष शेंडकर
मंगळवार, 24 जुलै 2018

निंबूत हद्दीतील बुवासाहेबनगर येथे नीरा, निंबुत, सोमेश्वर येथील तरूणांनी एकत्र येत आज सकाळी अकरापासून नीरा-बारामती रस्त्यावर बसकण मारली. सुरवातीला काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सोमेश्वरनगर - मराठा आरक्षणप्रकरणी समाजातील तरूणांनी निंबूत (ता. बारामती) येथे नीरा-बारामती रस्त्यावर सुमारे पन्नास मिनिटे धरणे धरले होते. याप्रसंगी काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर मराठा आरक्षणप्रकरणी सरकारचा निषेध करण्यात आला.

निंबूत हद्दीतील बुवासाहेबनगर येथे नीरा, निंबुत, सोमेश्वर येथील तरूणांनी एकत्र येत आज सकाळी अकरापासून नीरा-बारामती रस्त्यावर बसकण मारली. सुरवातीला काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानंतर कामगार नेते बाळासाहेब काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, नीरा गावचे माजी सरपंच राजेश काकडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक काकडे, आदींनी मनोगत व्यक्त करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. आरक्षण बाब सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु सरकारकडून वेळकाढूपणा होत आहे. काकासाहेब शिंदे यांच्या निधनास सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे असा आरोप, दीपक काकडे यांनी सविस्तर भाषणात केला. तर राजेश काकडे यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. याप्रसंगी शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे, प्रसिध्द दंतचिकीत्सक डॉ. कुलदीप काकडे, शैलेश शिंदे, नितीन जगताप, कुलदीप पवार, सचिन मोरे, विशाल काकडे, सुमित काकडे, अमर काकडे आदी उपस्थित होते. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक-एक किलोमीटरची वाहनांची रांग लागली होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Tribute to Kakasaheb Shinde at Nimbu Baramati