
या दोन मिनिटांच्या व्हिडीओतून महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला मानवंदना दिली आहे. या व्हिडिओचे संकलन मनन कोठारी यांनी केले आहे. सध्याच्या कठीण व आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या पोलिसांचे विविध मूड आणि क्षण टिपले आहेत.
पुणे : कोरोनामुळे पसरलेल्या या जागतिक महामारीच्या काळात प्रत्येकजण आपापल्यापरीने सामाजिक जाणीव व्यक्त करत इतरांना मदत करत आहे. दरम्यान या काळात स्वतःचा जीव धोक्यात ठेवून दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिस, डॉक्टर, वैद्यकीय सेवक यांचे योगदान मोठे आहे. या कोरोना योध्यांना मानाचा मुजरा देण्यासाठी काही कलांवतांनी 'वंदे मातरम' या गाण्यावर एक व्हिडिओ तयार केला आहे. 'वंदे मातरम' हे गीत संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले असून गायिका आर्या आंबेकर हिने गाण्याला आवाज दिला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारतातील मनोरंजन क्षेत्रातील प्रख्यात निर्माते आणि परसेप्ट लिमिटेडचे संस्थापक, बॉस एन्टरटेन्मेंट, सनबर्न कार्यक्रम आदींची सुरुवात करणारे शैलेंद्र सिंग आणि उद्योगपती ऋषी सेठिया यांनी एकत्र येवून एक मानवंदना लघुपट निर्माण केला आहे. या दोन मिनिटांच्या व्हिडीओतून महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला मानवंदना दिली आहे. या व्हिडिओचे संकलन मनन कोठारी यांनी केले आहे. सध्याच्या कठीण व आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या पोलिसांचे विविध मूड आणि क्षण टिपले आहेत.
दोन महिन्यांनंतर पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर दागिन्यांची झळाळी
या व्हिडिओसाठीचे लेखन आणि दिग्दर्शन शैलेंद्र सिंग यांनीच केले आहे्. सिंग या व्हिडिओ बद्दल म्हणाले, “महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस जे काम करत आहेत, त्याची झलक पूर्ण भारताला देण्याचा माझा मानस यामागे आहे. हे शूरवीर आज घरी जावू शकत नाहीत किंवा कुटुंबाला वेळ देवू शकत नाहीत. या व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण जगातील भारतीयच आपल्या या पोलिसांना मानवंदना देत आहेत.”
पुण्यातील ८० वर्षांच्या आजीबाई जिंकल्या कोरोना विरूध्दची लढाई