शहीद सचिन मोरे यांना मानवंदना; पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

गलवान खोऱ्यात भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनी जवानांसोबत झालेल्या कारवाईमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. दरम्यान या घटनेमुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे : लेह येथील अतिशय प्रतिकूल वातावरणात रस्त्याचे काम सुरू असताना लष्कराच्या 115 इंजिनिअर्स या तुकडीतील नायक सचिन मोरे हे दरीत कोसळल्याने शहीद झाले. त्यानंतर शुक्रवारी (ता.२६) खासगी विमानाने त्यांचे पार्थिव पुण्यात आणले होते.

- '... अशी सुरु ठेवता येतील सलून अन् ब्युटी पार्लर'; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश!

यावेळी शहीद नायक मोरे यांना दक्षिण मुख्यालयातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव लष्करी वाहनामधून पुण्यातून त्यांच्या मूळगावी म्हणजेच नाशिकमधील मालेगाव येथे नेण्यात आले. शनिवारी (ता.२७) त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

- 'कमवा शिका' योजनेच्या निधी वाटपात सावळा गोंधळ; विद्यापीठ करतंय दुजाभाव!

गलवान खोऱ्यात भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनी जवानांसोबत झालेल्या कारवाईमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. दरम्यान या घटनेमुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सीमावर्ती भागात रस्ते बांधणीची कामे वेगाने करण्यास सुरुवात केली आहे.

लेह येथे अशाच एका महत्त्वाच्या रस्त्याचे काम सुरू असून पुलाची बांधणी करताना नायक सचिन मोरे हे दरीत कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानतळावर मोरे यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. तसेच त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribute to Martyr Sachin More on behalf of South Headquarters