'सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

"जब शहर हमारा सोता है..., एक बगल में चॉंद होगा..., हम कहेंगे अमन, हम कहेंगे मोहब्बत.., ना ही सुनाओ लहू की कथा, मोहब्बत मोहब्बत की बातें करो' अशा गीतांतून पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना "सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है''' अशा शब्दात गायक-संगीतकार पीयूष मिश्रा यांनी पाकिस्तानला सुनावले. 

पुणे : "जब शहर हमारा सोता है..., एक बगल में चॉंद होगा..., हम कहेंगे अमन, हम कहेंगे मोहब्बत.., ना ही सुनाओ लहू की कथा, मोहब्बत मोहब्बत की बातें करो' अशा गीतांतून पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना "सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है''' अशा शब्दात गायक-संगीतकार पीयूष मिश्रा यांनी पाकिस्तानला सुनावले. 

रसिकांकडून येणाऱ्या खास फर्माईशीनुसार काही गाणी पीयूष मिश्रा यांनी गायली मात्र, त्यांचं स्वतःचं सर्वांत आवडतं एक गाणं मात्र रसिकांनी वारंवार फर्माईश करूनही ते गाणे टाळले. ते गाणं होतं- हुसना. या गाण्याचे बोल आहेत ""कहते हैं जिसको दूजा मुल्क उस पाकिस्तॉं में पहुंचे, लिखता हूँ खत मैं हिंदोस्तॉं से, पहलू-ए हुसना पहुंचे, ओ हुसना...'' दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तान जोपर्यंत स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत हे गाणं गाणार नाही, असे मिश्रा यांनी पुणे स्मार्ट वीकच्या कार्यक्रमात सांगितलं. 

पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने पुणे स्मार्ट आर्ट वीकमध्ये मिश्रा यांचे "बल्लिमारॉं' हे पुणेकरांना एक वेगळ्या रसास्वादाचा अनुभव देणारे सादरीकरण ठरले. 

पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत. दरम्यान, या हल्ल्यातील हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी पीयूष मिश्रा यांचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आला. 

"पीयूष मिश्रा यांनी एक प्रकारे यातून आम्हा पुणेकरांच्या भावना व्यक्त करीत आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली, "असे पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले. 

हस्ताक्षरावर कार्यशाळा उत्साहात 

तत्पूर्वी, सकाळी राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीमध्ये प्रसिद्ध हस्ताक्षर कलाकार चंदन माहीमकर यांची हॅंड लेटरिंगसंदर्भातील खास कार्यशाळा झाली. यामध्ये पेपर आणि पेन्सिलचा वापर करून हॅंड लेटरिंगच्या मूलभूत गोष्टी शिकविण्यात आल्या.

चंदन माहीमकर यांनी स्वतःचे वेगळे हस्ताक्षर तयार करण्याचे कौशल्य शिकवले आणि रचना तयार करण्यात स्वतःची शैली निर्माण करून त्यात समतोल साधण्यास शिकवले. 

Web Title: Tribute for Martyr Soldier with Song