हवेत गोळीबार करून तिसऱ्या मजल्यावरुन उडी

Tried to commit suicide because one side love
Tried to commit suicide because one side love

पुणे : किरकोळ कारणावरुन पिस्तुल काधुन गोळीबार करण्याचे प्रकार शहरात सातत्याने सुरु आहेत. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता एकतर्फी प्रेमातून एकाने हवेत गोळीबार करून तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना बालेवाडी जकात नाका परीसरात घडली.

सूरज सोनी (वय 23, रा. मध्य प्रदेश) असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. सूरज हा भारती विद्यापीठ येथे शिक्षण घेत आहे. त्याचे बालेवाडी येथील निकमार्क कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. त्याने मुलीकडे प्रेमाची कबुली दिली होती. मात्र तिने त्यास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या सूरजने मंगळवारी सकाळी मुलगी राहत असलेल्या वसतिगृहाच्या तिसऱ्या मजलयावर जाऊन गोळीबार केला. त्यानंतर तेथून उडी मारली. या प्रकारामुळे सूरज गंभीर जखमी झाला असून त्यास चतुशृंगी पोलिसांनी खासगी रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com