तृप्ती देसाई यांना अटक आणि सुटका

trupti.jpg
trupti.jpg

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णलयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळे फासण्याची धमकी दिल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना आज (ता.12) बंडगार्डन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत सकाळी अटक केली होती. चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तरी त्यांना सध्या नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.  

डॉ. चंदनवाले यांनी राज्य सरकारकडे सादर केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे एमपीएससीने तेव्हा दिलेल्या जाहिरातीमधील अटींना धरुन नाही. त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सरकारची फसवणुक केल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये करत त्यांना काळे फासणार असल्याचा इशारा देसाई यांनी दिला होता. त्याविरुद्ध डॉ.चंदनवाले यांनी बंडगार्डन पोलिस ठान्यात तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिसांनी देसाई यांना त्यांच्या कात्रज येथील घरातुन ताब्यात घेतले होते. डॉ.चंदनवाले यांच्याविषयीचे देसाई यांनी घेतलेले आक्षेप व गैरसमज दूर झाले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिस ठाण्यामध्ये आणून त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन सोडण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com