200 फूट दरीत ट्रक कोसळला, चालक ठार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी- वाफगाव या रस्त्यावरून राजगुरुनगरच्या (ता. खेड) दिशेने चाललेला रेतीने भरलेला ट्रक वागदरा घाटाच्या  धोकादायक वळणार 200 फुट दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक विजय शंकर गावडे (वय 40, रा. गावडेवाडी, ता. आंबेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 20) दुपारी हा अपघात झाला. 

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी- वाफगाव या रस्त्यावरून राजगुरुनगरच्या (ता. खेड) दिशेने चाललेला रेतीने भरलेला ट्रक वागदरा घाटाच्या  धोकादायक वळणार 200 फुट दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक विजय शंकर गावडे (वय 40, रा. गावडेवाडी, ता. आंबेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 20) दुपारी हा अपघात झाला. 

विजय गावडे हे राजगुरुनगर दिशेला रेती भरलेला ट्रक घेऊन चालले होते. मात्र, वागदरा घाटात त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दहा ते बारा वेळा पलटी होऊन दरीत कोसळला. रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठडे नसल्याने ट्रक रस्ता सोडून वागदरा दरीत 200 फुट खोल गेला. 

दरम्यान, गावडेवाडी- वाफगाव हद्दीत तीन स्टोन क्रेशर आहेत. स्टोन क्रेशरवरील डबर, रेतीची वाहतूक ट्रकने या हद्दीतून असलेल्या रस्त्याने केली जाते. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गावडेवाडीतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत ट्रक वाहतूक करण्यास विरोध केला होता. परंतु, स्टोन क्रेशर मालकांच्या दहशतीमुळे वाहतूक चालूच ठेवली. ग्रामस्थांनी स्टोन क्रेशर मालकाविरोधात संताप व्यक्त केला आहे. 

दरम्यान, आदर्शगाव गावडेवाडी- वाफगाव या रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठाडे बसवण्यात यावेत. तसेच, रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सरपंच किरण गावडे केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck collapse in Wagdara Ghat, driver dies