पुणे: शिवाजीनगरजवळ ट्रक नदीत कोसळून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

अग्निशामक दलाच्या जवानांनी ट्रकमधील एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. आणखी एक व्यक्ती मृत झाल्याची शक्यता आहे. ट्रक पूर्णपणे उलटा झाला असल्याने तो काढण्यासाठी मोठा क्रेन मागविण्यात आला आहे.

पुणे : अपघातग्रस्त ट्रक शिवाजीनगरहुन पुणे स्टेशनच्या दिशेने जाट होता. पहाटे साडेचार वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने रेल्वे पुलाशेजारील पुलाचा ५० फूट लांबीचा कठडा तोडून ट्रक मुठा नदीत कोसळला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, बचावकार्य सुरु आहे. 

अग्निशामक दलाच्या जवानांनी ट्रकमधील दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी एक व्यक्ती मृत झाल्याची शक्यता आहे. माणिकराव गायकवाड यांच्या मालकीचा ट्रक असून मृत चालकाचे नाव चंद्रकांत शिवन्ना (रा. मतकी, तालुका आलंद, जि.कलबुर्गी, कर्नाटक) आहे. अलिबाग येथुन लोखंडाची भुकटी घेऊन संबंधीत ट्रक हा कलकत्ता येथे जात होता. ट्रक पूर्णपणे उलटा झाला असल्याने तो काढण्यासाठी मोठा क्रेन मागविण्यात आला आहे. अपघातग्रस्त ट्रक हा बारामतीचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान शिवाजीनगरहून कामगार पुतळामार्गे पुणे स्टेशनच्या दिशेने जाणारी वाहतूकीची काही प्रमाणात कोंडी झाली होती. या घटणेनंतर पुलांच्या मजबुतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

<

Web Title: truck collapsed in river Pune

टॅग्स