टोलनाक्याजवळ ट्रक जळून खाक; एकाचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

- लोणावळ्यानजीक वरसोली टोलनाक्याजवळ जळाला ट्रक. 

लोणावळा : मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील वरसोली टोल नाक्याजवळ आज पहाटे ट्रकला भीषण आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या घटनेत ट्रक जळून खाक झाला आहे. महामार्गावरच ट्रक मोठ्या प्रमाणात पेटल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Fire

आगीत होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सध्या केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck Fire Near Varasoli Toll Plaza One People Died