'बीएचआर' गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांकडे ट्रकभर पुरावे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ट्रकभर पुरावे जप्त केले आहे. जळगाव, औरंगाबादसह अन्य ठिकाणी पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये महत्वाची कागदपत्रे, शपथपत्रे, लॅपटॉप, पीसीओ व अन्य डिजीटल साहित्य जप्त केले आहे. या छाप्यामध्ये अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

लॅपटॉप, पीसीओसह डिजिटल साहित्य पोलिसांनी केले जप्त 
पुणे - भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ट्रकभर पुरावे जप्त केले आहे. जळगाव, औरंगाबादसह अन्य ठिकाणी पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये महत्वाची कागदपत्रे, शपथपत्रे, लॅपटॉप, पीसीओ व अन्य डिजीटल साहित्य जप्त केले आहे. या छाप्यामध्ये अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन, पिंपरी व ग्रामीण पोलिसांकडे गुन्हे दाखल होते. या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव येथील "बीएचआर'च्या संचालक व पदाधिकाऱ्यांच्या घरांवर शुक्रवारी सकाळी एकाचवेळी छापे घातले होते. त्यातुन मिळालेल्या माहितीच्या आधारे औरंगाबादसह अन्य ठिकाणीही झडती घेण्यात आली होती. या कारवाईमध्ये पोलिसांना एक ट्रक भरुन कागदपत्रे मिळाली आहेत. या कागदपत्रांची पोलिसांकडून सध्या छाननी सुरू आहे. या कागदपत्रांमध्ये ठेवीदारांच्या पावत्या, कर्जदारांचे शपथपत्रे, अनेक बनावट शिक्के असे साहित्य आहे. बॅंकेने केलीली कागदपत्रे व आरोपींनी बेकायदेशीरपणे लोकांकडून केलेली कागदपत्रे, संबंधीत कागदपत्रे लिलावातील की तारण याची तपासणी सुरू आहे. या सर्व कागदपत्रांची छाननी करुन त्याचा पुरावा म्हणून वापर करण्यासाठी पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. 

बॅकलाॅगची परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीनेच; गैरप्रकारांना बसणार आळा

सुजीत सुभाष बावीस्कर उर्फ वाणी (वय 42), धरम किशोर सांखला (वय 40), महावीर माणिकचंद जैन (वय 37), विवेक देवीदास ठाकरे (वय 40, चौघेही रा. जळगाव) यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. 2015 मध्ये "बीएचआय' पतसंस्थेमध्ये जिंतेंद्र कंडारे याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.2016मध्ये कंडारे याची अवसायक म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी गैरव्यवहार उघड होऊ नये, यासाठी कंडारे याने जाणीवपुर्वक लेखापरीक्षण केले नाही. त्यानंतर या प्रकरणात कंडारे याच्यासह माहेश्‍वरी प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, योगेश सांखला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बदल करण्यासाठी मुदत

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचा प्रमुख सहभाग आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सुचेता खोकले यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये दोन पोलीस उपायुक्त, चार सहायक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 25 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि 100 पोलिसांचा सहभाग होता. 

कंडारे व अन्य आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक 
आर्थिक घोटाळ्याचा जितेंद्र कंडारे हा मुख्य सुत्रधार आहे. त्यातील सर्व व्यवहारांची त्यास इत्यंभुत माहिती आहे. त्यामुळे त्याला व त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठीही स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. 

पुणे पोलिसांच्या कारवाईचे ठेवीदारांकडून स्वागत 
बीएचआरचे ठेवीदार, गुंतवणुकदार, ग्राहक यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. ठेवीदार मागील दोन वर्षांपासून त्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करीत होती. मात्र त्यावेळी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहीले गेले नाही, सध्याच्या कारवाईमुळे न्याय मिळेल, अशी अपेक्षा ठेवीदारांना वाटत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck wide evidence to police in BHR malpractice case