बच्चू कडू यांच्याविरोधात तृप्ती देसाई यांची तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

विदर्भातील शेतकरी अडचणीत असताना कडू हे भाजप व शिवसेनेच्या विरोधात आंदोलन का करत नाहीत, अशी पोस्ट फेसबूकवर टाकली होती. कडू समर्थकांनी अर्वाच्च भाषेत त्यांचा समाचार घेतला होता.

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांच्याबाबत केलेल्या फेसबुक पोस्टमुळे निर्माण झालेला वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोचला आहे. कडू यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार धनकवडी पोलिस चौकीत देसाई यांनी दाखल केली आहे. 

विदर्भातील शेतकरी अडचणीत असताना कडू हे भाजप व शिवसेनेच्या विरोधात आंदोलन का करत नाहीत, अशी पोस्ट फेसबूकवर टाकली होती. कडू समर्थकांनी अर्वाच्च भाषेत त्यांचा समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर देसाई आणि कडू यांच्यात भ्रमणध्वनीवर संभाषण झाले होते. त्या संवादात कडू यांनी धमकी दिल्याचा आरोप देसाई यांनी केला आणि तशी तक्रार शुक्रवारी संध्याकाळी दाखल केली आहे.

बच्चू कडूंना तृप्ती देसाई म्हणतात, की आता भाजप-शिवसेनेच्या विरोधात आसूड यात्रा काढा तर ते म्हणतात तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवायचा नाही. असे उपदेश आम्हाला करू नका अन्यथा परिणामाला सामोरे जा". 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trupti Desai case filed against Bacchu Kadu in Pune