
ट्रस्ट,धर्मादाय संस्थांनी अंदाजपत्रक २८ फेब्रुवारीपूर्वी सादर करावे
पुणे: नोंदणीकृत ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांनी पुढील आर्थिक वर्षाचे प्रस्तावित उत्पन्न व खर्च दर्शविणारे अंदाजपत्रक २८ फेब्रुवारीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. ज्या धार्मिक ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा जास्त आणि इतर धर्मादाय संस्थांचे दहा हजारांपेक्षा अधिक असेल त्यांना अंदाजपत्रक सादर करावे लागणार आहे.
हेही वाचा: Pune Corporation Election: निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे
या अंदाजपत्रकात एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या मालमत्तेमध्ये होणारी वाढ अथवा विक्रीद्वारे येणारी रक्कम, उद्दिष्टनिहाय तसेच प्रशासकीय खर्चासाठीची तरतूद, संस्थेचे काही विशेष उपक्रम सुरू होणार असतील तर त्यासाठीच्या आर्थिक नियोजन, संस्थेची देणी, कर्जफेड याबाबतच्या नियोजनाची माहिती देणे गरजेचे आहे. तसेच, ट्रस्टच्या नावे बॅंकेमधील मुदत ठेवी व त्यांवर मिळणारे व्याज, इतर गुंतवणूक, त्यावरील परतावा, खासगी देणग्या, सीएसआर प्रकल्प, सरकारी अनुदान अशा सर्व उत्पन्न स्त्रोतांची माहिती अंदाजपत्रकात नमूद करावी लागते. यासोबत विद्यमान सर्व विश्वस्तांची नावे आणि त्यांनी हे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मान्य केल्याचा ठराव सोबत जोडावा लागतो. याबाबतची संपूर्ण माहिती छापील नमुना अर्जात भरून २८ फेब्रुवारीपूर्वी संबंधित धर्मादाय कार्यालयांच्या लेखा शाखेमध्ये जमा करून पोहोच घ्यावी. सर्व ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी आपल्या चार्टर्ड अकौंटन्ट यांच्याशी संपर्क करून अंदाजपत्रक दाखल करण्याची वेळेत पूर्तता करणे आवश्यक आहे.
अंदाजपत्रक सादर न केल्यास वार्षिक लेखा परिक्षण अहवालामध्ये तशी नोंद केली जाते. अशी नोंद विश्वस्तांची अकार्यक्षमात म्हणून समजली जाऊ शकते.
ॲड. शिवराज कदम जहागीरदार, अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
Web Title: Trusts Charities Submit Budgets 28th February
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..