"शेतजमीन उत्पादनक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पुणे : ""गावातील शेतजमीन अधिकाधिक उत्पादनक्षम बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकांना गावातच नोकरीची संधी, रोजगाराचे साधन आणि शिक्षण मिळाले तर गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर थांबेल'', असे मत "वनराई'चे रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले.

श्री मल्लिकार्जुन प्रतिष्ठानतर्फे धारिया यांना "सामाजिक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयराज मोरे, कोशाध्यक्ष रमेश साळवी, बाळू चव्हाण, नगरसेविका अश्‍विनी जाधव, ऍड. पी. टी. जगदाळे, सुनील कदम, प्रतिष्ठानचे सचिव अशोक मोरे उपस्थित होते.

धारिया म्हणाले, ""अनेक जण कामानिमित्त गाव सोडून शहरात येतात. परंतु, शहरात आल्यानंतर त्यांचं गावाशी असलेलं नातं तोडलं जाऊ नये. शहरातील आणि गावातील समस्या वेगवेगळ्या आहेत. गावात पाण्याचा प्रश्‍न भीषण आहे. जानेवारी-फेब्रुवारीतच काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवायला लागते. झाडाची मूळ पाणी अडवून आणि माती धरून ठेवतात. मात्र, सध्या बेसुमार वृक्षतोड होत असल्यामुळे भूजल पातळीही खालावत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.'' प्रास्ताविक जयराज मोरे यांनी, तर सूत्रसंचालन साळवी यांनी केले.
 
Web Title: try to make land fertile