इंधनपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

पुणे - लोणी काळभोर येथील ‘हिंदुस्थान पेट्रोलियम डेपो’च्या धर्तीवर सोरतापवाडीनजीक तरडे (ता. हवेली) येथे ‘भारत पेट्रोलियम कंपनी’चा डेपो होणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने ६७.९३ एकर जागा कंपनीकडे हस्तांतर केली. येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 

पुणे शहरासह मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पेट्रोलियम इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीचा तरडेत हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी त्यांनी राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे ९० एकर जागेची मागणी केली होती.  

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यामध्ये तरडे गावामधील ६७.९३ एकर शासकीय जागा भारत पेट्रोलियम कंपनीला हस्तांतर करण्यात आली आहे. पुढील काळात जागेच्या आसपासची अतिक्रमणे काढून उर्वरित जागासुद्धा कंपनीकडे हस्तांतर करण्यात येणार आहे. 

या जागेसाठी भारत पेट्रोलियमने सुमारे २६ कोटी ३८ हजार रुपयांची रक्कम प्रशासनाकडे सुपूर्त केली. या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचे भारत पेट्रोलियमने आश्‍वासित केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भारत पेट्रोलियम कंपनीने पुणे शहराच्या आसपास डेपो उभारण्यासाठी जागेची मागणी केली होती. त्यानुसार तरडे गावातील महसूल विभागाची ६७ एकर जागा हस्तांतर केली आहे. कंपनीला हा डेपो उभारणीसाठी आंध्र प्रदेश सरकारने मोफत १०० एकर जागा देण्याची तयारी दर्शविली होती; परंतु कंपनीने पुण्याजवळ जागेला यासाठी पसंती दिली आहे. या ठिकाणी भविष्यात पेट्रोलियमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. 
- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी पुणे

Web Title: Try to smooth fuel supply