इंदापूर तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार- बापट

राजकुमार थोरात 
रविवार, 20 मे 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिले.  लासुर्णे (ता.इंदापूर) येथे भाजपा युवामोर्चा वतीने पालकमंत्री बापट यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वाकसे व इंदापूर तालुक्यातील युवकांनी बापट यांच्या समोर आपल्या मागण्या मांडल्या. लासुर्णे येथील ग्रामदैवत श्री निलकंठेश्वर मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, पुणे जिल्हा परिषदेच्या रूग्णावाहिकेवरील चालकांना वेळच्या वेळी वेतन देण्यात यावे, सर्व चालकांना एनआरएचएम मध्ये समाविष्ट करुन घ्यावे, संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील गायरानामध्ये राहणाऱ्या कुंटूबाची घरे रस्त्यामध्ये जाणार असून या बाधित कुटूंबाना नुकसान भरपाई मिळावी, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील कामगारांना घरासाठी जमीन द्यावी, अशा मागण्य़ा करण्यात आल्या.

बापट यांनी सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा अध्यक्ष आमदार बाळा भेगडे, रंजन तावरे, तानाजी थोरात, नानासाहेब शेंडे, माऊली चवरे आदि उपस्थित होते.
 
Web Title: try to solve issue of pending works in indapur taluka - Bapat