पुण्यात रेल्वे रुळावरून पाडण्याचा प्रयत्न होतोय का?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

पुणे रेल्वे अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये रेल्वे रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र रेल्वे कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळे होणाऱ्या मोठ्या दुर्घटना टळल्या.

पुणे : पुण्यात रेल्वे रुळावरून पाडण्याचा प्रयत्न होतोय का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे समोर आलेली धक्कादायक माहिती. पुणे रेल्वे अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये रेल्वे रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र रेल्वे कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळे होणाऱ्या मोठ्या दुर्घटना टळल्या.
 

'एप्रिल मे महिन्यात हातकणंगले परिसरात दोन वेगवेगळया ठिकाणी अज्ञात लोकांनी लोखंडी तुकडे रेल्वे ट्रकवर टाकून रेल्वेचा नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला. काही दिवसांपूर्वी तळेगावमध्ये कामशेत येथे हैद्राबाद मुंबई एक्सप्रेसला टारगेट केलं होतं. गेले अनेक दिवसात रेल्वे प्रशासनाच्या अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमूळ मोठ्या दुर्घटना टळल्या आहेत. अशा गुन्हेगारी व्यक्ती कोणाला आढळल्यास पोलिसांना कळवण्याचा आवहान पोलिसानी केले आहे.

आतापर्यत अशा ८ ते १० घटना समोर आल्याचे डीआरएम, पुणे डिव्हिजन मिलिंद देऊसकर यांनी सांगितले आहे

 

Web Title: Is trying to break down the railway track in Pune?