लोणी काळभोरच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी राहू प्रयत्नशील - हेमलता काळोखे

लोणी काळभोरच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी राहू प्रयत्नशील - हेमलता काळोखे

उरुळी कांचन - पुणे जिल्हा अध्ययन समृद्धी उपक्रमाअंतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने 'शैक्षणिक गुणवत्तेसाठी' तीन महिण्यापुर्वी केलेल्या तपासणीत, शैक्षणिक गुणवत्तेत हवेली तालुका शेवटच्या स्थानी आला आहे. ही बाब तालुक्यातील पंचायत समितीचे पदाधिकारी, शिक्षण अधिकारी व शिक्षकांनाही लाजवणारी आहे. मात्र यापुढील काळात हवेली तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढ हे चॅंलेज पंचायत समितीने स्विकारले आहे. पुढील तीन महिन्यात हवेली तालुका पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेत पुन्हा पहिल्या कांही नंबरात यावा यासाठी सामुहिक प्रयत्न करणार आहोत अशी माहिती हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे यांनी दिली. 

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने 'शैक्षणिक गुणवत्तेसाठी' तीन महिन्यापुर्वी केलेल्या तपासणीत, शैक्षणिक गुणवत्तेत हवेली तालुका तेरावा अशी बातमी दै. सकाळमध्ये "शिरुरने पटकावला प्रथम क्रमांक" या शिर्षकाखाली गुरुवारी (ता. 7) प्रसिध्द झाली होती. याबाबत पंचायत समितीच्या सभापती काळोखे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वरील माहिती दिली. 

याबाबत बोलतांना हेमलता काळेखे म्हणाल्या, शैक्षणिक गुणवत्तेत शिरुर प्रथम, पुरदंर तालुका दुसऱ्या स्थानी तर आंबेगाव तालुका तिसऱ्या स्थानी आहेत ही बाब गौरवास्पद आहे. मात्र हवेली तालुका सगळ्यात बाबतीत समृध्द असतांनाही, शैक्षणिक गुणवत्तेत मात्र तेरावा येणे ही बाब अतिशय लाजीरवाणी आहे. हवेली तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी मागिल वर्षभऱापासुन प्रयत्न सुरु आहेत. मात्र लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने केलेल्या तपासनीत हवेली तेरावा स्थानी आल्याची माहिती कोणीच आम्हा पदाधिकारी अथवा पंचायत सदस्यांना दिलेली नव्हती. शहराच्या चारही बाजुला पसरलेला, जिल्हा परीषदेच्या मुख्यालयापासुन चारही बाजुला हाकेच्या अंतरावर असणारा व जिल्हातील तेराही तालुक्यांच्या तुलनेत शैक्षणिक पायाभुत सुविधांच्या बाबतीत वरचड असणारा हवेली तालुका शैक्षणिक गुणवत्ते बाबतीत शेवटच्या म्हणजे तेराव्या स्थानी असणे ही बाब खटकली आहे. मात्र यापुढील तालुका शैक्षणिक गुणवत्तेत कोणत्याही परीस्थीतीत पुढे जावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. गटशिक्षण अधिकारी व शिक्षकांनाही तशा सुचना करण्यात आल्या असुन, यापुढील काळात शैक्षणिक गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड करण्यात येणार नाही. 

तक्रारी असणाऱ्या शाळांची झाडाझडती स्वतः घेणार- दरम्यान पूर्व हवेलीमधील ज्या कांही शाळातील शिक्षक शाळेच्या वेळेत बॅंकेत अथवा वैयक्तिक कामासाठी बाहेर जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशा तीनही शाळात येत्या कांही दिवसातच पंचायत समितीच्या वरीष्ठ अधिकार्यासस स्वतः भेट देणार आहे. संबधित शाळांची झाडाझडती घेण्याबरोबरच, शिक्षक आपल्या कामात हलगर्जीपणा करत असल्याचे आढळल्यास, कायदेशिर कारवाई करण्यासही मागेपुढे पहाणार नाही. दरम्यान नागरीकानींही आपआपल्या हद्दीतील शिक्षक वेळेवर शाळेत येतात की नाही यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. नागरीकांनी कामचुकार करणाऱ्या शिक्षकांची नावे पंचायत समितीला कळविल्यास, संबधित नागरीकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही काळोखे यांनी यावेळी स्पष्ठ केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com