पुणे : पीएमपी युनिव्हर्सल पासवरून ‘तू-तू मैं-मैं’

‘पीएमपी’ वाहक अन् प्रवाशांमध्ये वाद; प्रमाणपत्र तपासणी सुरू
PMPML Universal Pass
PMPML Universal Passsakal

पुणे : राज्य सरकारने दिलेल्या नव्या सूचनांनुसार पीएमपी प्रवासासाठी युनिव्हर्सल पास (Universal Pass)आणि लशीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र सोबत बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचनेनुसार सोमवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या दिवसाच्या पीएमपीच्या वेट ॲँड वॉच (Wait and watch)भूमिकेनंतर मंगळवारपासून प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली. मात्र, वाहक आणि प्रवाशांमध्ये ‘तू-तू मैं-मैं’ झाल्याचे दिसले, तर ज्येष्ठ नागरिकांनी वाद घालत होते, यामुळे वाहक त्रासल्याचे दिसून आले.

PMPML Universal Pass
पुणे : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ११ हजार ७४८ नवे कोरोना रुग्ण

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. ‘पीएमपी’ने प्रवास करायचा असेल, तर दोन लशीचे डोस घेणे बंधनकारक आहे. ज्यांनी दोन डोस घेतले असतील, त्यांना प्रवास करता येणार आहे. ‘पीएमपी’ने पाठविलेल्या आदेशानुसार शहरातील सर्व बस आगारात आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशाकडून प्रथम पास आणि लशीचे दोन डोस घेतले आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर सकारात्मक उत्‍तर आल्यावर वाहकाकडून तिकीट दिले जाते. तसेच, ज्यांच्याकडे पास नाही किंवा एकच डोस घेतलेल्यांना प्रवास नाकारला असता वाद होताना दिसून आले. स्थानक सोडता मार्गावरील बस थांब्यावरून प्रवाशांना पासची मागणी करणे कठीण असल्याचे दिसून आले. रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बस फार काळ थांबवणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवासी थेट बसमध्ये आल्यावर त्यांच्याकडून पासची मागणी केली जाते. नसेल तर लगेच बसमधून उतरवणे शक्य होत नाही. या सर्व बाबींची तपासणी करताना वाहक त्रासले होते.

PMPML Universal Pass
बारामती : उसाच्या ट्रॉलीला गाडीची धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

तपासनिसाकडेच पासची मागणी...

तिकीट तपासणी करणे सोपे आहे, तसे युनिव्हर्सल पास आणि लशीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र तपासणीचे काम नाही. प्रवाशांना या गोष्टी समजून सांगाव्या लागतात, तरी काही प्रवाशांनी चांगले सहकार्य केले. तरुणांकडून अरेरावी केली जाते. पहिल्यांदा प्रवासी वाहक आणि तपासनिसाला पासची मागणी करतात. पीएमपीच्या सर्व कामगारांकडे पास असून, दोन लस घेतल्या आहेत, असे सांगत आम्ही पास दाखवतो. काहींनी एक लस घेतली आहे. दुसरी घेण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, असे सांगितले जाते. त्यांना सूचना दिल्या जातात, असे तिकीट तपासनिसांनी सांगितले.

बस स्थानकावर पासची तपासणी करणे तसे काही वेळा शक्य आहे. रेल्वे, एसटी बस, खासगी वाहतूक याला असे नियम लावणे शक्य आहे. परंतु, दैनंदिन गर्दीच्या ठिकाणी हे शक्य होणार नाही.

- सचिन गोरे, प्रवासी

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रवासी संख्या घटली आहे. या नियमाचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. वाद झाल्याची तक्रार आली नाही. सर्व प्रवाशांनी नियमांचे पालन करावे.

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com