पुणे - पिंपळे निलख येथे क्षयरोग जनजागृती रॅली

रमेश मोरे
शनिवार, 24 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : पिंपळे निलख येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कै.सोपानराव नथोबा ईंगवले व कै. भाऊसाहेब नथोबा साठे शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत येथील आरोग्य विभागाच्या क्षयरोग नियंत्रण केंद्राच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. या दरम्यान या आजाराविषयी नागरीकांना माहिती देऊन उपचार व आजार टाळण्यासाठी माहितीपत्रिका देण्यात आली.

क्षयरोग म्हणजे काय, त्याची कारणे व उपचाराबाबत आरोग्य विभागाचे डॉ. होडगर यांनी विद्यार्थी व नागरीकांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले, सकस पौष्टीक आहार, व योग व्यायामाबरोबरच उपचाराबाबत नियमितता व घेतल्यास हा आजार टाळता येतो.रूग्णांनी याचा डॉक्टरांच्या अधिपत्याखाली मार्गदर्शनानुसार उपचार घेतल्यास हा आजार हमखास बरा होतो. यावेळी नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास नगरसेविका आरती चोंधे उपस्थित होत्या.

Web Title: Tuberculosis Awareness Rally in pimple nilakh