'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्यास अटक

milind-dastane.jpg
milind-dastane.jpg

पुणे : औंध येथील पीएनजी ब्रदर्स'ची 25 लाखांची फसवणूक प्रकरणातील "तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता मिलिंद दास्ताने यास पत्नीसह अटक करण्यात आली. चतुःश्रृंगी पोलिसांनी मंगळवारी सकाळी पुण्यातील घरुन अटक केली. याप्रकरणी मागील आठवड्यात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने, त्याची पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे (दोघेही रा. त्रिमूर्ती सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी "पीएनजी ब्रदर्स'च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (वय 34, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून दास्ताने दाम्पत्यविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दास्ताने याने औंध येथील आयटीआय रस्त्यावरील "पीएनजी ब्रदर्स' सराफी पेढीमधील कर्मचाऱ्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तेथून वारंवार सोने-चांदीचे दागिने, बिस्कीटे व हिरे खरेदी केले होते. त्यानंतर दास्ताने याने खरेदी केलेल्या दागिन्यांची काही प्रमाणात रक्कम दिली होती. मात्र उर्वरीत रक्कम व त्यावरील व्याज देण्यास दास्ताने हा वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करीत होता. वारंवार मागणी करुनही दास्ताने बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने अखेर "पीएनजी ब्रदर्स'च्या अक्षय गाडगीळ यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी दास्ताने यास अटक केली

''पीएनजी ब्रदर्सची फसवणुक करणारा अभिनेता मिलिंद दास्ताने व त्याच्या पत्नीस आज सकाळी अटक करण्यात आली. " 
- भास्कर जाधव, पोलिस निरीक्षक, चतु:शृंगी पोलिस ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com