तुकाई टेकडीला राडारोड्याचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

हडपसर - तुकाई टेकडीवर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असल्यामुळे मोठे ढीग तयार झाले आहेत. त्यामुळे टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. येथे माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता असून, प्रशासन मात्र डोळे झाकून बसल्याने नागरिक संतप्त आहेत. 

हडपसरच्या तुकाईदर्शन येथे तुकाई टेकडीच्या पायथ्याला नगरसेवक योगेश ससाणे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्या वेळी टेकडीवर राडारोड्याचे मोठे ढीग निर्माण झालेले दिसून आले. टेकडीवर शेड मारून अतिक्रमणेही केल्याचे आढळले. पालिकेने टेकडीवर झाडे लावायचा संकल्प केला असला, तरी पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.  येथे रोज सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला मॉर्निंग वॉकसाठी येतात. त्यांना राडारोड्यामुळे चालताही येत नाही. येथील राडारोडा व अतिक्रमणे काढून टाकण्याची मागणी स्थानिक रहिवासी व नगरसेवक योगेश ससाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

संपूर्ण टेकडीला राडारोडा व अतिक्रमणाने विळखा घातला आहे. टेकडीच्या पायथ्याला शेकडो घरे आहेत. येथे माळीणसारख्या दुर्घटनेची शक्‍यता नाकारता येत नाही. वेळीच उपाययोजना न केल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. 
- योगेश ससाणे, नगरसेवक

Web Title: tukai hill garbage