दुमदुमली अवघी देहूनगरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मार्च 2019

देहू - तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात शुक्रवारी अवघी देहूनगरी दुमदुमली. 

संत तुकाराम महाराजांचा ३७१ बीजसोहळा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार देहूच्या इंद्रायणी नदीच्या तीरावर पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित होते. टाळमृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषात देहूनगरी न्हाऊन निघत होती. लाखोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांनी दुपारी साडेबारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. 

जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीजसोहळ्यासाठी लाखो भाविक गेल्या दोन दिवसांपासून देहूत दाखल झाले होते. बीज सोहळ्याच्या दिवशी पहाटेपासूनच मुख्य देऊळवाड्यात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे इंद्रायणी नदीत स्नान करून भाविक दर्शनासाठी मंदिरात येत होते.

सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पादुका असलेल्या पालखीने वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान ठेवले. पालखीच्या पुढे सनई चौघडे, ताशे, नगारे, अब्दागिरी आणि टाळकरी होते. पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती. वैकुंठस्थान मंदिरासमोर संस्थानचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कीर्तनकार बापूसाहेब मोरे यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यावर कीर्तन झाले.

Web Title: tukaram bij sohala dehu