‘तुकाराम मुंढे यांची नियुक्‍ती महापालिका आयुक्तपदी करा’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

पुणे - ‘कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी, तर कार्यकाळ संपत आलेले आयुक्त कुणाल कुमार यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी,’ अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पक्षाचे शहर प्रमुख हेमंत संभूस यांनी निवेदनात म्हटले आहे, की कुणाल कुमार यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ संपत आला असून, एक- दोन महिन्यांत त्यांची बदली होणार आहे. त्याचा विचार करून तुकाराम मुंढे यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्त करायला हवा. मुंढे यांना राज्य सरकारने पाठबळ दिल्यास पुणेकर नागरिकही त्यांना साथ देतील.

कुणाल कुमार यांच्याकडे पीएमपीची सूत्रे सोपविली, तर दोन्ही शहरांतील सार्वजनिक वाहतुकीच्या समस्या सोडविण्याच्या प्रक्रियेला गती येईल. त्यामुळे राज्य सरकारने मुंढे यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी आणि कुणाल कुमार यांची पीएमपीमध्ये नियुक्ती करावी. प्रलंबित प्रश्‍नांची यादी वाढत असतानाच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे आणि त्या बाबतच्या वादामुळे नागरिकांच्या मनात अस्थिरता निर्माण होऊ नये, याची खबरदारीही सरकारने घ्यावी, अशी अपेक्षाही संभूस यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

Web Title: tukaram munde municipal collector selection