बारामती : कर्मचा-यांच्या संपामुळे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील कामकाज थंड

मिलिंद संगई
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

बारामती शहर - राज्य सरकारी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांनीही तीन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. या मुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज थंडावले आहे. 

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय शिक्षकेतर संघटनेच्या वतीने महाविद्यालयाबाहेर कर्मचारी बसून आहेत. संघटनेचे अध्यक्ष डी.आर. कुंभार, उपाध्यक्षा सुषमा संगई, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा, ज्ञानेश्वर लिंगे, अमोल पाटील यांच्यासह साठहून अधिक शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. 

सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर त्वरित रोख स्वरुपात द्यावा, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावे, कालबध्द पदोन्नती योजनेत कर्मचा-यांना पात्र झालेल्या दिनांकापासून तीन महिन्यात योजनेचा लाभ मिळावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. 

Web Title: Tuljaram Chaturchand College's work cooled down due to the staff agitation