पोलीस पाटील परीक्षेत तुपे, खेडेकर, भोसले यशस्वी

कृष्णकांत कोबल
शनिवार, 2 जून 2018

मांजरी (पुणे) : साडेसतरानळी गावच्या मनिषा तुपे, शेवाळवाडीच्या अमृता खेडेकर तर मांजरीचे अमोल भोसले यांनी पोलीसपाटील पदासाठी झालेल्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्यामुळे या सर्वांची त्या त्या गावच्या पोलीस पाटील पदावर नियुक्ती पक्की झाली आहे.

साडेसतरानळी व शेवाळवाडी येथील पोलीसपाटील पदासाठी दोन उमेदवारांनी तर मांजरी बुद्रुक गावच्या या पदासाठी पाच उमेदवारांनी परीक्षा दिली होती. साडेसतरानळी येथील उमेदवार मनिषा महेश तुपे यांनी 62 गुण मिळवीत यश प्राप्त केले. त्यांच्या बरोबरच्या उमेदवार स्मिता अशोक बहिरट यांना 49 गुण मिळाले.
 
शेवाळवाडी गावच्या अमृता अलंकार खेडेकर यांनी 71 गुण मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार स्मिता रामदास आक्काले यांच्यावर मात केली आहे. आक्काले यांना 58 गुण मिळाले आहेत.

मांजरी बुद्रुक गावच्या पोलीसपाटील पदासाठी अमोल दत्तात्रय भोसले, कुणाल रमेश ढवळे, मिलिंद विनायक आहिरे, विकी शैलेंद्र खलसे व बिपिन उत्तम भोसले अशा पाच उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये अमोल भोसले यांनी सर्वाधिक 74 गुण मिळवून यश प्राप्त केले. इतर उमेदवारांना अनुक्रमे 71,68,67 व 66 इतके गुण मिळाले. 

Web Title: tupe khedekar and bhosale pass in police patil exam