व्यसनधिनते ऐवजी व्यायामाकडे वळा- रोहित पवार

संतोष आटोळे 
रविवार, 10 जून 2018

शिर्सुफळ : "तरुणांनी व्यसनधिनतेच्या आहारी न जाता व्यायामाकडे लक्ष देवुन शरीर संपदा सदृढतेसाठी सक्षम असणे आवश्यक आहे.", असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले. 

शिर्सुफळ : "तरुणांनी व्यसनधिनतेच्या आहारी न जाता व्यायामाकडे लक्ष देवुन शरीर संपदा सदृढतेसाठी सक्षम असणे आवश्यक आहे.", असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले. 

कटफळ (ता.बारामती) येथे जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या माध्यमातुन उभारण्यात येणाऱ्या व्यायाम शाळेच्या तसेच रांधणव वस्ती नळपाणीपुरवठा, व दलितवस्ती अंर्तगत सरकारी देवाखाना ते समाज मंदिर रस्ता काँक्रेट कामाच्या शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, सरपंच सारिका भारत मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे, ग्रामपंचायती सदस्य कांतिलाल माकर, कस्तरा कांबळे, भालेराव मोकाशी, दादाराम झगडे, बबन कांबळे, तानाजी मोकाशी, ग्रामसेविका अमोल घोळवे यांच्यासह ग्रामस्थ, तरुण वर्ग उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी उपस्थित युवक वर्गाला संबोधित करताना युवकांनी शरिर संपदेकडे लक्ष देत नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
 

Web Title: Turn to exercise instead of addiction - Rohit Pawar