सलग सुट्यांमुळे नागरिकांच्या अडचणीत भर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

"एसबीआय'ची एटीएम सुरू राहणार; व्यापाऱ्यांना स्वाइप मशिन मिळेनात
पुणे - शनिवार-रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवस सुट्या आल्याने बॅंकांचे व्यवहार पुन्हा ठप्प होणार असून, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. बंद असणारी एटीएम, खात्यातून पाच हजारांपर्यंतच मिळणारी रक्कम यामुळे चलनाची चणचण आणखी भासणार आहे.

महिन्याचा दुसरा शनिवार, रविवारची सुटी आणि सोमवारी ईद-ए-मिलान आल्यामुळे बॅंकांना तीन दिवस सुटी आहे. त्यामुळे तिन्ही दिवशी बॅंकांकडून कोणतेही आर्थिक व्यवहार होणार नसल्याची माहिती बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्यामुळे आणि बॅंकांचे व्यवहार बंद राहणार असल्यामुळे आधीच अडचणीत असणाऱ्या नागरिकांसमोरील अडचणी वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. कितीही कॅशलेसबाबत बोलले जात असले, तरी व्यावसायिकांना स्वाइप मशिन मिळण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

याबाबत "स्टेट बॅंक ऑफ इंडिया'चे सहायक सरव्यवस्थापक अजय जोशी म्हणाले, 'तिन्ही दिवस बॅंकांचे सर्व शाखांचे आर्थिक व्यवहार बंद राहणार आहेत. पण, आम्ही नागरिकांची गरज ओळखून "एटीएम'मध्ये पैसे उपलब्ध करून देणार आहोत. बॅंकेच्या नोटा पुरवठा करणाऱ्या शाखांकडून एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून दिले जातील. पुण्यात बॅंकेची 400 एटीएम आहेत. त्यापैकी बहुतांश एटीएममध्ये पैसे उपलब्ध असतील.'''

बंदची खातेदारांना सूचना
"कॉसमॉस बॅंके'चे अध्यक्ष मिलिंद काळे म्हणाले, 'तिन्ही दिवस बॅंकांच्या सर्व शाखा बंद असतील, याची पूर्वसूचना खातेदारांना देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी त्याआधीच आर्थिक व्यवहार करणे गरजेचे होते. बॅंका बंद असल्यामुळे अडचणी येणे साहजिकच आहे. आमच्याकडे कॅश उपलब्ध असून, मंगळवारपासून बॅंकांचे व्यवहार पूर्ववत सुरू होतील.''

Web Title: Turning around a row of citizens holiday

टॅग्स