मुळा रस्ता वळण बनतेय धोकादायक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

पुणे : मुळा रस्ता येथील बोट क्‍लबसमोरच्या सर्कलकडील वळणावर दररोज छोटे-मोठे अपघात होत असल्याने हे वळण धोकादायक बनून वाहनचालकांच्या दृष्टीने मृत्यूचा सापळा ठरत आहे. भविष्यकाळात एखादी भीषण घटना घडण्याअगोदर महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालक करीत आहेत.

अंडी उबवणी केंद्राकडील चौकातून सिग्नल सुटला की मुळा रस्त्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे सर्कलकडील वळणावर अनेक भरधाव वाहनांचे अपघात होत आहेत. सर्कलच्या याच वळणावर मंगळवारी (ता. 23) मोठा अपघात होता होता वाचला. मुळा रस्त्याकडे वळणाऱ्या ट्रक आणि मोटारीची जोरदार धडक झाली. मात्र ट्रकचालकाने प्रसंगावधान दाखवत ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये कारच्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या सर्कलवरून शिवाजीनगरच्या दिशेने जाताना व येताना तसेच अंडी उबवणी चौकात जाताना व येताना एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेक वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. दरम्यान सकाळ व सायंकाळी शाळा, कॉलेज व कार्यालयीन वेळेत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सर्कलच्या पुढे नागरीवस्ती असल्याने त्यांचा वावरही भरपूर असतो. वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिकांना हा रस्ता ओलांडतानादेखील कसरत करावी लागते. त्यामुळे या रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turning road is becoming dangarous